Friday, September 24, 2021

Gym मध्ये घाम गाळल्याने Brain Sharp होतो


वजन कमी करण्यासाठी आपण नियमीत जीमला (Gym) जात असतो. बऱ्याच जणांची दिवसाची सुरवातच  जीमला जाण्याने होते. जीममध्ये घाम (Physical Exercises) गेला की दिवसभर आपल्याला फ्रेश वाटते. पण तुम्हाला माहित आहे का जीममध्ये घाम गेल्याने केवळ वजनच कमी होते असे नाही तर बुध्दीमता तल्लक( Sharp Brain) होण्यास मदत होते.  तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण  हे खरं आहे एका रिसर्चमधून हे पुढे आले आहे. जे 'सिजोफ्रेनिया बुलेटीन' यात प्रकाशित केले आहे.



आपल्याला दिवसभर फ्रेश वाटावे म्हणून बऱ्याच ट्रिक्स आपण वापरतो. खाण्याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करतो. बुध्दीमत्ता वाढवण्यासाठी घरात आई बरेच उपाय करत असते. अशा लोकांसाठी गुड न्यूज आहे. तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही. तुम्ही फक्त जिममध्ये (Gym) जाऊन घाम गाळून बुध्दीमत्ता वाढवू शकता.



रिसर्चनुसार ज्यांची शरीरयष्ठी सृदृढ आहे असे लोक ज्यादा बुध्दीमान असतात. या संशोधनात पाच लाख लोकांचा सर्व्हे  केला गेला. यात ब्रिटनमधील ४७५,३९७ सहभागी लोकांवर सर्व्हे  केला गेला. ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विश्वविद्यालयातील संशोधक जोसेफ फिर्थ यांच्या म्हणण्यानुसार ज्यांची शरीरयष्ठी सृदृढ आहे असे लोक ज्यास्त बुध्दीमान असतात आणि ती बौध्दिक  कामे खूप करतात. त्यामुळे चला उठा आणि जीमला जा...



No comments:

Post a Comment